-
करोनाविरुद्ध लढ्यात सध्या समाजाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्ती समोर येत आहेत. यात राजकीय कार्यकर्त्यांपासून, खेळाडूंपर्यंत ते उद्योगपतींचाही समावेश आहे. मात्र पालघरचे मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी सध्याच्या खडतर काळात सर्वांसमोर एक नवीन आदर्श घालून दिला आहे. ( सर्व छायाचित्र – मनसे वृत्तांत अधिकृत फेसबूक)
-
सध्याच्या खडतर परिस्थितीत काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या किराणा दुकानातून तुलसी जोशी ९९९ रुपयांत ९ वस्तू उपलब्ध करुन देत, त्यांच्यावरील भार हलका करण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
आपल्या हेमलता किराणा दुकानात जोशी यांनी पोलिस, डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा केली आहे.
-
माणसंच नाहीत तर रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या प्राण्यांचीही तुलसी जोशी तितकेच काळजी घेत आहेत.
-
माकडांच्या कळपाला केळी देताना तुलसी जोशी, या सर्व कामासाठी जोशी यांना कधीकधी स्वतःच्या खिशातले पैसे टाकावे लागतात.
-
तुलसी यांनी दाखवलेल्या या सामाजिक जबाबदारीचं मनसेच्या नेतृत्वानेही कौतुक केलं आहे.
-
लॉकडाउन घोषित होण्याआधीही तुलसी जोशी यांनी आपल्या गावाकडे जाणाऱ्या कामगार व प्रवाशांना मोफत मास्क आणि पाण्याची बाटली अशी मदत केली होती.
-
त्यांच्या या कार्याचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…