-
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकाडाउन आहे. जिवनावश्यक वस्तू वगळता सर्व गोष्टी या काळात बंद आहेत. सामान्य आणि कष्टकरी जनतेला मात्र या काळात बराच त्रास सहन करावा लागत आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुण्याच्या अप्पर इंदीरानगर परिसरातील बिबवेवाडी परिसरात रेशन दुकानासमोर लागलेली रांग हे याचंच एक जिवंत उदाहरण आहे.
-
रविवारपासून या रेशन दुकानावर सरकारी नियमाप्रमाणे ५ किलो तांदूळ मिळण्यास सुरुवात झाली आहे.
-
त्यामुळे या केंद्राबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती.
-
एकीकडे घरी धान्य घेऊन जायची चिंता आणि आजुबाजूला करोनाचं सावट यामुळे शक्य होईल तितकं लोकं सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
मात्र काही ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आवरता येत नाहीये….
-
दुकान सुरु होईपर्यंत मग अशी वाट पाहत राहणं या लोकांच्या हातात असतं.
-
सध्या राज्यातील अनेक रेशन दुकानांवर धान्याचा काळाबाजार घडत असल्याचं समोर आलंय, त्यामुळे सर्व जिल्हा प्रशासनाला अशा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
-
दरम्यान सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनचं धान्य मिळणार अशी सुविधा राज्य सरकारने केली आहे.
-
गृहिणी, आबालवृद्ध या रांगेत वाट पाहत ताटकळत उभे असतात
-
प्रत्येक जण आपापल्या चेहऱ्यावर मास्क लावून योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत असतो
-
काही केल्या कष्टकऱ्यांच्या नशिबातला संघर्ष कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…