-
नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला असून मोठी घोषणा केली आहे. १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवत असल्याचं यावेळी नरेंद्र मोदींनी जाहीर केलं. नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित करताना ही माहिती दिली. नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत.
-
“करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
-
-
नरेंद्र मोदी यांनी LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली असून त्यामधून करोना संकट आणि त्याच्याशी सामना करण्यासंबंधी भाष्य केलं आहे. (संग्रहित फोटो)
-
“महिन्यापूर्वी जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त बाधित झालेत, हजारो लोकं प्राणास मुकलीत. भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही. परंतु या अनुभवातून हे स्पष्ट झालंय की आपण जो रस्ता निवडला तोच बरोबर आहे. सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाउनचा खूप फायदा झालाय. फक्त आर्थिक बाजू बघितलं तर खूप महाग पडल्याचं दिसू शकतं, खूप किंमत चुकवायला लागली, परंतु जिवितापेक्षा मोठं काही नाही,” असं नरेंद्र मोदींन यावेळी म्हटलं. (संग्रहित फोटो)
-
करोनाचा फटका प्रत्येकाला समान बसला आहे. करोना फैलाव करण्याआधी कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे करोनाशी लढा देताना आपल्याला एकता आणि बंधुता यांना प्राथमिकता दिली पाहिजे असं आवाहनही नरेंद्र मोदींनी केलं आहे. (संग्रहित फोटो)
-
आपण सर्वजण या संकटात एकत्र असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. (संग्रहित फोटो)
-
“इतिहासात याआधी देश आणि समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते. पण आज संपूर्ण जग मिळून एका आव्हानाचा सामना करत आहे. त्यामुळे भविष्यात एकत्रित आणि लवचीकपणा महत्त्वाचा असणार आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (संग्रहित फोटो)
-
“सरकार उद्या विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार” (संग्रहित फोटो)
-
“मी हे बदल स्विकारत आहे. माझे सहकारी मंत्री असोत किंवा अधिकारी किंवा जागतिक नेते….माझ्या जास्तात जास्त बैठका आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. (संग्रहित फोटो)
-
भारतासारखा तरुण देश जो आपल्या उत्साही विचारसणीसाठी ओळखला जातो तो या नव्या संस्कृतीला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतो अशी अपेक्षा नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे. (संग्रहित फोटो)
-
“युवा वैज्ञानिकांनो पुढे या, करोनावर लास शोधा” (संग्रहित फोटो)
-

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”