-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरात मजूर वर्गाला या निर्णयाचा फटका बसताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र – प्रशांत नाडकर)
-
रोजगार तुटल्यामुळे आता ही मंडळी मिळेल त्या पर्यायाचा वापर करत आपल्या गावाकडे निघालेली आहेत
-
मुंबई-आग्रा महामार्गावर सायकलवर मिळेल ते सामान लादून आपल्या गावची वाट धरणारे मजूर
-
स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता आणि प्रश्न कायम आहेत, आपण घरी पोहचणार तरी कधी??
-
प्रवास इतका मोठा आणि खडतर आहे की कधीकधी हातातलं सामान मागे राहतं…पण मजुरांना आता सामानाची फारशी चिंता नाहीये
-
वाटेत कुठेही मोफत जेवणाची सोय दिसली की थांबायचं आणि चार घास पोटात ढकलायचे
-
करोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं वगैरे ठीक आहे हो…पण हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार तुटला की काही गोष्टींचं भान राहत नाही
-
काही जणं रांगेत उभं राहतात तर काही जण खाली बसून आराम करणं पसंत करतात
-
कारण इतका मोठा प्रवास करायचा असेल तर थोड्या विश्रांतीची गरज सर्वांनाच असते.
-
फुटपाथवर झाडाच्या सावलीखाली विसावलेला कामगार
-
जेवता-जेवता मग थोड्याशा गप्पा रंगतात
-
काही जणं यादरम्यान थोडीशी डुलकी घेणं पसंत करतात
-
झाडाच्या सावलीत विसावलेले कामगार
-
विश्रांती झाली की मग पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाची चिंता
-
कष्टकऱ्यांच्या नशिबातला संघर्ष काहीकेल्या कमी होत नाही
-
डोक्यावर सामान आणि कडेवर मुलाला घेऊन घराची वाट पकडलेली महिला कामगार
-
या परिस्थितीतही आपल्या मुलाला ऊन लागू नये याची काळजी आई घेताना दिसतेय
-
सध्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी आहे…पण तरीही प्रवासादरम्यान धोका हा कायम असतो
-
वाटेत कितीही संकटं आली तरीही थांबायचं नाही हेच आता या कामगारांनी ठरवलं आहे
-
या कामगारांचा प्रवास किती खडतर असणार आहे याची साक्षच हे झाड देत आहे असं वाटतंय
-
रस्त्याच्या कडेला विसावलेले तरुण कामगार
-
संकटकाळात शहराने साथ सोडली म्हणून अखेरीस या मजुरांना गावची वाट पकडावी लागली
-
गड्या आपला गाव बरा असं म्हणतात ते काही खोटं नाही
-
सूर्य मावळतीला आला तरीही डोक्यावरचं ओझं काही पाठ सोडेना. करोनामुळे भारतातला मजूर वर्ग खऱ्या अर्थाने त्रासला गेला आहे

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…