-
पिंपरी चिंचवड मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या हाती मी गाढव आहे मला सांगितलेले कळत नाहीचे फलक
-
पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून निगडी प्राधिकरणकडे पाहिले जाते. परंतु, तेच नागरिक मात्र नियमांची पायमल्ली करत असल्याच दिसत आहे.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर अवघा देश बंद आहे. संचारबंदी असल्याने बाहेर निघण्यास नागरिकांना मज्जाव आहे.
-
असं असताना देखील काही उच्चशिक्षित नागरिक मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते.
-
निगडी पोलिसांनी त्यांना पकडून यांच्यावर कारवाई करत 'मी गाढव आहे मला सांगितलेले कळत नाही' असे मजकूर असलेले फलक हातात देऊन वेगळी शिक्षा दिली.
-
मार्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दहा नागरिकांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली
-
त्यांच्यावर १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे. यातील काही जनांनी मास्क देखील घातले नव्हते.
-
काहीजण तर कुत्रे फिरवण्यासाठी बाहेर पडले होते.
-
पोलिसांनी संबंधित व्यक्तींच्या हाती काही मजकूर असलेले फलक देण्यात आले होते.
-
'मी गाढव आहे मला सांगितलेले कळत नाही'……'मी आदेश पाळत नाही कारण मी उच्च शिक्षित दीड शहाणा आहे'….असे केल्याने उच्चशिक्षित व्यक्ती बाहेर पडणार नाहीत अशी आशा पोलिसांना आहे.
ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सोनवणे यांनी केली आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग