आपल्या संवादफेकीच्या खास शैलीमुळे कलाविश्वात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे इरफान खान. (सौजन्य: सर्व फोटो जनसत्ता/ इंडियन एक्स्प्रेस) उत्तम अभिनय आणि दर्जेदार कथानकांची निवड यामुळे इरफान लोकप्रिय झाला होता. इरफानची प्रोफिशनल लाइफ साऱ्यांनाच ठाऊक होती. मात्र त्याच्या पर्सनल लाइफविषयी फारसं कोणाला माहित नव्हतं. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या इरफानने अनेक नावाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूडमध्येही त्याच्या अभिनयाचा डंका वाजला होता. 'पानसिंग तोमर', 'मकबूल' या हिंदी चित्रपटांसोबतच त्याने 'नेमसेक','ॲसिड फॅक्टरी', सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं होतं. याचं चित्रपटांच्या माध्यमातून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. इरफान खानचा चित्रपट म्हटलं की काही तरी वेगळं बघायला मिळणार हे प्रेक्षकांना माहित असायचं त्यामुळे त्याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतं. ‘हासिल’, ‘मकबुल’, ‘पिकू’, ‘पानसिंग तोमर’, ‘लंचबॉक्स’, ‘तलवार’, बिल्लू बार्बर,न्यूयॉर्क,सात खून माफ, ये साली जिंदगी,क्रेझी 4,संडे या हिंदी चित्रपटांमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला. हिंदी चित्रपटांप्रमाणेच त्याने ‘लाइफ ऑफ पाय’, ‘स्पायडर मॅन’ आणि ‘ज्युरासिक वर्ल्ड’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. केवळ चित्रपट नाही तर इरफानने काही मालिकांमध्येही काम केलं होतं. यात 'चंद्रकांता', 'चाणाक्य','डर' या मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. उत्तम अभिनयशैलीमुळे इरफानला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. यात त्याला २०११ मध्ये पद्मश्री, २००३ आणि २००७ मध्ये फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. तसंच त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. २९ एप्रिल २०२० मध्ये इरफानने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट