-
मुंबई : जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील २६ पोलिसांना करोनाची लागण झाल्यामुळे खळबळ माजली होती. राज्यातील एकूण करोनाबाधित पोलिसांपैकी ५० टक्के पोलीस मुंबईतील आहेत.
-
करोनाशी लढणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्वत: जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याला भेट दिली.
-
यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची जातीनं विचारपूस केली. कर्मचाऱ्यांना उद्देशून भावस्पर्शी भाषणंही केले.
-
अतिरिक्त पोलीस आयुक्त निशित मिश्रा, उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार हे देखील यावेळी आयुक्तांसमवेत होते.
-
या अनामिक शुत्रुशी लढण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरच आहे. शेवटी विजय आपलाच आहे, अशा शब्दांत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.
-
पोलिसांनी आत्तापर्यंत दंगली, बॉम्बस्फोट, संघटित गुन्हेगारी मोडून काढली. आता त्यांची लढाई ही अनामिक शत्रुशी आहे.
-
या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी वरळी कोळीवाडा, धारावी तसेच करोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी भेटी देऊन पोलिसांचे मनोधैर्य वाढविले.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग