-
संपूर्ण देशभरासह महाराष्ट्र राज्य अजुनही करोनाच्या विळख्यात आहे. राज्यात पुणे शहराला करोनाचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र परिस्थितीनुरुप अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महापालिकेने करोनाचा प्रभाव कमी असलेल्या क्षेत्रात दुकानं उघडायला परवानगी दिली आहे. ( सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
तब्बल ४० दिवसांनंतर पुण्याच्या डेक्कन भागात गुरुवारी काही बुटाची दुकानं उघडलेली पहायला मिळाली.
-
पुण्यातल्या डेक्कन भागात करोनाचा फारसा प्रभाव दिसलेला नाही.
-
प्रदीर्घ कालावधीनंतर दुकान उघडल्यानंतर साफसफाईमध्ये व्यस्त असणारे मालक व कर्मचारी वर्ग
-
दुकानं उघडी ठेवण्यासाठी पालिकेने काही नियमही आखून दिले आहेत. ज्यात स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग हे महत्वाचे नियम आहेत.
-
कर्वेनगर भागातही काही गिफ्ट, स्टेशनरी आणि नॉवेल्टी शॉपही उघडण्यात आली.
-
दुकानं उघडलेली लक्षात येताच आपल्याला गरजेच्या वस्तू विकत घेताना गिऱ्हाईक
-
लॉकडाउन काळात हातावर पोट असलेल्या अनेक छोट्या उद्योगधंद्यांना चांगलाच फटका बसला. पुण्यात चप्पल-बुट दुरुस्त करणाऱ्यांनीही आज श्रीगणेशा केला.

२८ जुलैनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण; वाचा तुमच्या नशिबी काय…