-
लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुरांना गावी परत जायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेश भागात राहणाऱ्या मुंबईतील काही मजुरांनी पायी चालत प्रवास करण्याचं ठरवलं आहे. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
विक्रोळी भागात स्थानिक लोकं या कामगारांना बिस्कीटचे पुडे, पाण्याच्या बाटल्या देऊन मदत करत आहेत. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
मजुरांसाठी केंद्र सरकारने रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. पण रोजगारासाठी मुंबईत आलेल्या प्रत्येक कामगाराकडे पैसा असेलच असं नाही, ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी मग आपलं सर्व सामान-सुमान डोक्यावर ठेवत चालत जात घराकडचा रस्ता पकडायचं ठरवलं आहे. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
गावावरुन मुंबईत आलेल्या आपल्या मित्रांसोबत मी मंडळी मजल-दरमजल करत पुढचा प्रवास करत आहेत. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
वाटेत रस्त्याच्या कडेला सावली दिसली की जरा आरामासाठी थांबायचं (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
आराम झाला की लगेच उठून पुढच्या प्रवासाची तयारी करायची…(छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
काही कामगार मोबाईलवर ताज्या घडामोडींचा आढावा घेत असतात. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
सगळे सोपस्कार पार पडले की मग परत सुरु होतो घराकडचा प्रवास. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनन्स भागात घरी जाण्यासाठी परप्रांतीय कामगार रांग लावून वाट पाहत आहेत. (छायाचित्र – प्रदीप दास)
-
पुण्यातील काही कामगारांवर दुहेरी संकट आलं आहे. घराचं भाडं न दिल्यामुळे या कामगारांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. (छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुण्याच्या वारजे पसिररात राहणाऱ्या या परप्रांतीय मजुराच्या कुटुंबाने अखेरीस कात्रज परिसरात काही आसरा मिळतो का या आशेने प्रवास सुरु केला. (छायाचित्र – पवन खेंगरे)
-
सोबत असलेल्या दोन मुलांना या परिस्थितीचा त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या आई काळजी घेत आहेत. (छायाचित्र – पवन खेंगरे)
-
प्रवासादरम्यान आजुबाजूला काही मदत मिळते आहे का यासाठी हा परिवार चौकशी करत आहे. (छायाचित्र – पवन खेंगरे)
-
केंद्र व राज्य सरकार सध्याच्या खडतर काळात भाडेकरुंकडून पैसे घेऊ नका असं आवाहन करत आहेत. तरीही देशातील काही भागांत कामगारांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. (छायाचित्र – पवन खेंगरे)
-
आधुनिक श्रावणबाळ ! मुंबई-पुणे रस्त्यावर शेडुंग टोल नाक्याजवळ आपल्या वडिलांना खांद्यावर घेऊन घरची वाट पकडलेला कामगार व त्याचं कुटुंब (छायाचित्र – नरेंद्र वसकर)

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय