-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. देशातील मजूर आणि शेतकरी वर्गाला या लॉकडाउनचा चांगलाच फटका बसताना पहायला मिळतो आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुण्यातील खेड-शिवापूर मार्गावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. मात्र लॉकडाउनमध्ये जवळपासच्या भागातील बाजारपेठा पूर्णपणे बंद असल्यामुळे पिकवलेल्या मालाचं करायचं काय हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
-
एकीकडे करोनाचं लॉकडाउन तर दुसरीकडे अवकाळी पावसाची चिंता…यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल गोण्यांमध्ये भरुन साठवून ठेवायला सुरुवात केली आहे.
-
कांद्याचं पिक मग अशा पद्धतीने शेतकरी वर्ग साठवून ठेवत आहे. माल तर तयार झाला आहे, परंतू लॉकडाउनमध्ये बाजारपेठा उघडल्याच नाही तर या पिकाचं करायचं काय ही चिंता शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे.
-
शासन पातळीवर उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहीत राज्यातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा अशी विनंती केली होती.
-
केंद्र सरकारने नाफेडला ४० हजार मेट्रीक टन इतकी मर्यादा घालून दिलेली आहे, ही मर्यादा ५० हजार मेट्रीक टन पर्यंत वाढवावी असं आवाहन पवार यांनी केलं आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हीत लक्षात घेता राज्य सरकारने ही विनंती केली आहे.
-
सध्या बाजारात कांद्याचा दर १० ते २० रुपये किलोच्या दरम्यान आहे, भविष्यकाळात हा भाव गडगडला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल अशी भीती पवार यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
-
अनुकूल वातावरणामुळे रबी हंगामात कांद्यांचं उत्पन्न अधिक वाढेल, तो कांदा बाजारात आल्यानंतर भाव गडगडले तर शेतकऱ्यांना नुकसान होईल असंही पवार म्हणाले आहेत

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल