-
रेल्वेची सुविधा उपलब्ध होत नसल्याने अस्वस्थ मजुरांनी ट्रक, टेम्पोने प्रवास करायची जोखीम घेतली आहे. (सर्व फोटो – सुहास जोशी)
-
शेकडो मजुरांनी कुठल्याही वाहनाची वाट न पाहता पायपीट सुरू केली आहे
-
रेल्वेगाडीसाठी नंबर केव्हा लागणार या अस्वस्थतेपोटी अनेक मजुरांनी ट्रकच्या प्रवासाचा पर्याय स्वीकारला.
-
अनेकांनी चार-पाच हजार रुपये खर्च करून गेल्या दोन दिवसांत नव्या कोऱ्या सायकल खरेदी केल्या आहेत.
-
प्रामुख्याने एकाच चाळीतील, वस्तीतील ५०-६० जणांचा समूह एकत्रपणे प्रवास करताना दिसत आहे.
-
सायकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे.
-
अनेकजण मिळेल त्या वाहनाचा वापर करत आहेत
-
लहान मुले, महिला, पुरुष असा सगळा गोतावळा एकाच टेम्पोमध्ये अत्यंत दाटीवाटीने प्रवास करत आहे.
-
खासगी बससाठी परवानगी मिळण्यास विलंब लागत असल्याने ट्रक अथवा टेम्पो हा पर्याय सोयीस्कर असल्याचे अनेकांनी सांगितले.
-
ट्रक, टेम्पोतील गर्दीचा त्रास आणि अनिश्चितता यापेक्षा सायकल दामटवणे बरे अशीच त्यांची मानसिकता दिसली.
-
नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीस अडवतील म्हणून अलीकडेच सर्व प्रवाशांना उतरवले जाते आणि रिकामी गाडी पुढे नेली जाते. मग प्रवासी पुढे चालत येऊन गाडीत जाऊन बसतात.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ