-
संकष्टी चतुर्थी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आंब्याची नेत्रदीपक आरास करण्यात करण्यात आली आहे. (सर्व फोटो – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
-
रत्नागिरी येथून खास मागविण्यात आलेल्या 3100 हापूस आंब्याने श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत आहे.
-
श्री विठ्ठला प्रमाणे श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आंब्याची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.
-
फळांच्या राजाने विठ्ठल-रुक्मिणीची सजावट केल्यामुळे देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत आहे.
-
जगावर ओढवलेलं करोनाचं संकट दूर करण्यासाठी आज पंढरपूरमध्ये विठूरायाला खास साकडं घालण्यात आलं.
-
विठ्ठलाच्या चरणी श्री विठ्ठल भक्त हरीश बैजल (अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेल) अजय सालुखे (उद्योगपती पुणे), उमेशभाई भुवा (सांगली) दीपकभाई शहा (सांगली) सुनील उंबरे (पंढरपूर) या भक्तांनी आंब्याची पूजा केली
-
करोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदीर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल