-
लॉकडाउनमुळं देशभरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी केंद्र शासनानं विशेष रेल्वे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
ट्रेन येईलपर्यंत काही प्रवाशांना स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत बसून काही काळ वाट पहावी लागली.
-
या ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान, स्थानकातील पादचारी पुलावर फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत ट्रेनची वाट पाहताना प्रवाशी.
-
केंद्राच्या या सुविधेचा फायदा घेण्यासाठी स्थलांतरीत कामगारांना अधिकृत ट्रान्झिट पास घेऊन प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
-
मुंबई शहरानजिकच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक रोजगारानिमित्त राहत आहेत. मात्र, सध्या लॉकडाउनमुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामळे त्यांनी आता घराकडं जाण्याचा रस्ता धरला आहे.
-
त्यानुसार, मजूरांना तसेच परराज्यातील नागरिकांना घेऊन जाणारी विशेष ट्रेन वसई रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशातील जोनपूर येथे जाण्यासाठी रविवारी रवाना झाली.

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’