-
महाराष्ट्रात करोनाचे वाढते रुग्ण पाहता नवी मुंबईतील वाशी परिसरात असणारं APMC मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (सर्व फोटो – नरेंद्र वसकर)
-
एरवी व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांनी फुलून जाणारी ही बाजारपेठ लॉकडाउन काळात अशी शांत झालेली दिसते.
-
१७ मे पर्यंत बाजार समिती बंद राहणार आहे.
-
त्यामुळे मुंबईत भाजीपाला पाठवणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे.
-
सरकारी नियमांप्रमाणे बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगसाठीची सर्व सोय करण्यात आली होती. परंतू वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
-
१७ मे नंतर सरकार लॉकडाउनबद्दल काय निर्णय घेतं हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असं APMC प्रशासनानं स्पष्ट केलंय.

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार