IAS आधिकारी डॉ. प्रियंका शुक्ला (IAS Priyanka Shukla) महिला सशक्तिकरणाचं देशातील एक मोठं उदाहरण आहे. २००९ च्या बॅचच्या प्रशासकीय आधिकारी असणाऱ्या प्रियंकाच्या जिद्दीची स्टोरी वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल. -
छत्तीसगढमध्ये प्रियंका शुक्ला सध्या आपलं कर्तव्य बजावत आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांचं काम उल्लेखनीय असल्याचे अनेक प्रसारमाध्यमांतून समोर आलं आहे.
-
छत्तीसगढमधील तरूण पिढीसाठी प्रियंका आदर्श आहेत. अनेक युवा मुलं-मुली त्यांच्याकडन आदर्श घेत आहेत,
हरिद्वारमध्ये लहानाची मोठी झालेल्या प्रियंकाच्या नेमप्लेटसमोर डीएम असावं अशी वडिलांची इच्छा होती. वडिलांसाठी प्रियंकाने डॉक्टर व्हायचे ठरवलं आणि ती झालीही. -
सर्व काही सुरळीत सुरू असताना प्रियंकाच्या आयुष्यात एक घटना घडली. त्या घटनेनं प्रियंकाला देशातील एक युवा आयएएस केलं. एका महिलानं प्रियंकाला तू काय कलेक्टर आहेस का? असा प्रश्न विचारत खडसावलं.. येथूनच सुरू झाला प्रियंकाचा आयएएस चा प्रवास…
-
लखनऊतील किंग्स जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून प्रियंकानं एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर इंटर्नशिप सुरू केलं. त्यावेळी एका झोपडपट्टीभागात उपचारासाठी प्रियंकाला जावं लागले.
-
त्यावेळी तेथील एका गरिब महिलासोबत तिची भेट झाली. यावेळी त्या महिलेला खराब पाणी पित असल्याचे पाहिलं. असं पाणी पिऊ नकोस म्हणून प्रियंका त्या महिलेला सांगत होती.
-
त्यावेळी दोघींमध्ये वाद झाला. त्या महिलेनं प्रियंकाला खडेबोल सुनावलं. तूझं ऐकायला तू काय कलेक्टर आहेस का? या प्रसंगानंतर प्रियंका पेटून उठली आणि आयएएस झाली -
जिल्हाधिकारी झाल्यानंतर प्रियंकाने गरिंबासाठी अनेक नवनव्या योजनांची सुरूवात केली. गोरगरिब मुलांच्या शिक्षणापासून रोजंदारीवर काम करणाऱ्यांपर्यंत अनेक योजना प्रियंकानं आमंलात आणल्या.
जुलै २०१२ मध्ये विद्यार्थांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी 'यशस्वी जशपुर'ची सुरूवात केली. -
ट्रस्ट जिला खनिज फाउंडेशनमार्फत जमा फंडातून शाळेत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आणि योजानाही सुरू करत जागृकता निर्माण केली.
-
त्याशिवाय प्रियंकानं २०१९ मध्ये आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जशपुर जिल्यात बेकरी उघडण्यास प्रोत्साहीत करत 'बेटी जिंदाबाद' नाव दिलं.
२० मुलींनी एकत्र येऊन बेटी जिंदाबाद नावाची बेकरी सुरूवात केली. याला सर्व मदत प्रियंकाने केली. -
प्रियंकाच्या कामामुळे सर्वजण त्यांना अभिमानाने सल्यूट करतात.
-
ज्यावेळी प्रियंका घराबाहेर निघते त्यावेळी लोक घाबरत नाहीत. तर प्रेमाने स्माइल देउल सेल्यूट करतात
-
असं म्हणतात की, जर एखादा आयएस आधिकारी काही नवीन करत नसेल तो सिस्टम बदलण्याचा प्रयत्न करत नसेल तर कारकून आणि त्यामध्ये काहीही फरक नाही. पण
-
प्रिंयका देशातील वेगळ्या धाटणीचं काम करणाऱ्या त्या मोजक्या आधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
-
डॉ. प्रियंका शुक्ला ज्यावेळी जमपुरनगरमध्ये आपलं कर्तव्य बजावत होत्या त्यावेळी त्यांनी नवीन कार्यक्रमाला सुरूवात केली होती. त्यावेळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना जिल्ह्यातील ४०० आधिकाऱ्यांना सोबत घेतलं होते. जेणेकरून सर्वजण फिट आणि तंदुरूस्तराहतील. शनिवारी जवळपास ७ किमी चालण्याचा व्यायाम प्रियंका ४०० जणांकडून घेत होते.
-
-
त्यामुळेच प्रियंका यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”