-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. गेले काही महिने आपल्या घरापासून दूर अडकलेल्या मजुरांनी अखेरीस मिळेल त्या मार्गाने घर गाठण्याचा प्रवास सुरु केला आहे. (सर्व छायाचित्र – आशिष काळे)
-
पुण्यावरुन सोलापूरला जाणारं हे कामगारांचं कुटुंब, टेम्पोत आजुबाजूला उभं राहत कसंही करुन गाव गाठायचं एवढाच विचार या मजुरांच्या डोक्यात घोळत आहे.
-
इतके दिवस घरापासून लांब राहिल्यानंतर अखेरीस केंद्र सरकारने आशेचा किरण दाखवला. मग अशावेळी उशीर न करता मिळेल तो पर्याय निवडत घरी जायचं हेच या कामगारांनी ठरवलं. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचं भान राहतं कधी राहत नाही….करणार काय घरी जायची ओढच खूप मोठी आहे…प्रत्येकाच्या मनात
-
आता सगळं काही देवाच्या हवाले…परराज्यात राहणाऱ्या कामगारांनाही आपल्या घरी जाण्याची परवानगी सरकारने दिली आहे. स्वारगेट बस स्थानकावर बस ची वाट पाहत थोडा वेळ आराम करणारा कामगार
-
प्रत्येक जण आपलं सामान एका बाजूला ठेवत, घरी जाण्यासाठी काही वाहन येतं का याची वाट पाहत आहे.
-
गेले काही दिवस या कामगारांनी अत्यंत कष्ट सोसले आहेत, पण प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतरही घर गाठेपर्यंत हे कष्ट सुरुच राहणार आहेत.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय