-
लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. यानंतर देशातील महत्वाच्या शहरांमध्ये अडकलेला मजूर वर्ग आपल्या घरी जाण्यासाठी तयार झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकाबाहेर छत्तीसगडला जाणाऱ्या गाडीसाठी अशी गर्दी जमली होती. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझन)
-
आपला सगळा संसार घेऊन परक्या शहरात काम-धंद्यासाठी आलेल्या या मजुरांच्या डोक्यात आता फक्त घरं गाठायचं एवढाच विचार आहे.
-
लहानग्या मुलाला पाठीशी बांधलं, डोक्यावर सामान घेतलं…तरीही डोळ्यातली चिंता काही केल्या कमी होत नाही. आपल घरी जाऊ ना हा विचार या महिलेच्या डोक्यात घोळत असणार !
-
काम आणि घर यांचा समतोल प्रत्येकाला साधावा लागतो. आता हाच समतोल साधत हे कामगार आपलं सामानसुमान घेत घरी निघाले आहेत.
-
लहानग्यांना कडेवर घेत ही मंडळी गाडी कधी येईल व आपल्याला स्टेशनमध्ये जायला कधी मिळेल याची वाट पाहत आहेत.
-
लहान लेकराला पाठीला बांधून घराकडे निघालेली ही महिला सध्याच्या जगातली हिकरणीच
-
याव्यतिरीक्त घराकडे जाण्यासाठी बस, ट्रक, टेम्पो यासारख्या प्रत्येक वाहनाचा उपयोग सध्या कामगरा करताना दिसत आहेत.
-
यासाठीही कितीही पैसे मोजण्याची त्यांची तयारी आहे.
-
एका टेम्पोत सुमारे १००-१५० लोकं भरली की मग हा प्रवास सुरु होतो.
-
भारतात कष्टकऱ्यांच्या नशिबी नेहमी हालाखीचं जगणं येत असतं. आजही या परिस्थितीत काहीही बदल घडलेला दिसत नाही.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS