-
मुंबई : येत्या काळात जर शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली तर खबरदारी म्हणून क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून जागांची पाहणी केली जात आहे. (सर्व छायाचित्र – प्रशांत नाडकर)
-
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेटचे मैदान वानखेडे स्टेडियमची पाहणी केली.
-
महपौरांनी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमला रविवारी भेट दिली.
-
या ठिकाणी गरज पडल्यास क्वारंटाइन सुविधा उभारण्यात येईल का? याचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
-
एकाच ठिकाणी एकाचवेळी अनेक रुग्णांची व्यवस्था करता यावी यासाठी शासनाकडून अशा प्रकारच्या मोठ्या मैदानांमध्ये क्वारंटाइन सुविधा उभारल्या जात आहेत
-
) प्रत्यक्षात मैदानात जाऊन त्यांनी जागेची पाहणी केली, यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना योजनेबाबत अधिक माहिती पुरवली.
-
लॉकडाउन असल्याने सध्या या मैदानात होणारे सामने क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे मैदान बंद असलं तरी या मैदानात नहमीप्रमाणे पाणी मारुन त्याची देखभाल घेतली जात आहे.
-
स्टेडियमचा आढावा घेतल्यानंतर बाहेर पडताना महापौर किशोरी पेडणेकर
-
मैदानाबाहेर आल्यानंतर महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांशी आणि मैदानाच्या व्यवस्थापकांची योग्य ती चर्चा केली.
-
आपल्या खासगी वाहनातून महापौर वानखेडे मैदान येथे पोहोचल्या असताना घेतलेले छायाचित्र

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल