-
पुणे : साधू वासवानी मिशनतर्फे सोमवारी गरीब, गरजू लोकांना जेवणाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. (सर्व छायाचित्रे – आशिष काळे)
-
कोरेगाव पार्क येथे रस्त्यांवर राहणारे बेघर नागरिक, निवारा गृहातील नागरिक तसेच गरजू व्यक्तींना मिशनतर्फे ही मदत देण्यात आली.
-
वाटप करण्यात आलेल्या खाद्य पदार्थांमध्ये जेवण, एक फळ, पिण्याच्या पाण्याची बाटली आणि बिस्किट पुडा यांचा समावेश होता.
-
मोठी रांग लावून गरजू लोकांनी साधु वासवानी मिशनतर्फे देण्यात आलेली ही मदत स्विकारली.
-
मदतीचे वाटप होत असताना गरजू लोकांनी आणि मदतीचे वाटप करणाऱ्यांनी आपल्या तोंडाला मास्क लावत फिजिकल डिस्टंसिंगचेही पालन केले.
-
कोरेगाव पार्क येथील महापालिकेच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात शहरात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवारागृहाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी मिशनतर्फे जेवण वाटप करण्यात आले.
-
या ठिकाणी देखील नागरिकांनी रांग लावून जेवण स्विकारले. मोठ्या प्रमाणावर इथे असलेल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला.
-
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी नागरिकांना जेवण वाटप करण्यात आले.
-
साधु वासवानी मिशनतर्फे नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यांमध्ये आरोग्य शिबिरांपासून, सवलतील आरोग्य सुविधा, गरजूंना साहित्या वाटप यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
-
मिशनतर्फे चालवण्यात आलेल्या या उपक्रमाबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल