-
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील राष्ट्रीय महामार्गावर नक्षलवाद्यांनी एका कंत्राटदारांच्या वाहनांची आज पहाटेच्या सुमारास जाळपोळ केली.
-
सृजनक्का या नक्षली कमांडरच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आज बंदचे आवाहन केले होते.
-
करोनाच्या टाळेबंदीत एक आठड्यापूर्वी नक्षलवाद्यांनी अतिदुर्गम भागात पत्रके टाकून ही बंदची घोषणा केली होती.
-
नक्षलवादी व पोलीस यांच्यात नुकत्याच झालेल्या चकमकीत जहाल नक्षली नेता सृजनाक्का ठार झाली आहे.
-
आजच्या बंद दरम्यान नक्षलवादी हिंसाचार घडवून आणतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल