-
SU-57 या अत्याधुनिक फायटर विमानाची रोबोटच्या सहाय्याने घेण्यात आलेली उड्डाण चाचणी यशस्वी ठरली आहे. (सर्व फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) (गॅलरीतील सर्व फोटो SU-57 चे नाहीत)
-
आरआयए नोव्होस्तीने या सरकारी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. अज्ञात स्थळी ही चाचणी घेण्यात आली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
SU-57 हे रशियाचे पाचव्या पिढीचे अत्याधुनिक फायटर विमान आहे. उड्डाणवस्थेत असताना रडारवरुन अदृश्य राहणे हे पाचव्या पिढीच्या फायटर विमानांचे वैशिष्टय आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
SU-57 ची अमेरिकेच्या F-22 रॅप्टरबरोबर मुख्य स्पर्धा आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
रोबोटद्वारे फायटर जेटच्या यशस्वी उड्डाणामुळे भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स शस्त्रास्त्र विकसित करण्याची स्पर्धा अधिक वेगवान होईल. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
प्रत्यक्षात युद्धाच्या प्रसंगात रोबोट फायटर विमानाचा वैमानिक असेल तर त्यामुळे मानवी नुकसान टाळता येऊ शकते. एकूणच ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’द्वारे भविष्यात युद्ध लढण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा होईल. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
SU-57 हा रशियाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. २०१० सर्वप्रथम SU-57 ने उड्डाण केले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
पुतिनने सीरियामध्ये या फायटर जेटची टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. मागच्यावर्षी एक SU-57 दुर्घटनाग्रस्त झाले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
SU-57 हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
“भारत सध्या तरी आपल्या हवाई दलासाठी एसयू-५७ विमानाचा विचार करत नाहीय. रशियन एअर फोर्समध्ये या फायटर विमानाचा वापर सुरु झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन करता येईल” असे इंडियन एअर फोर्सचे माजी हवाईदल प्रमुख बी.एस.धनोआ यांनी रशियन दौऱ्यावर म्हटले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल