-
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून बंद असलेली पुण्यातील दुकानं आता हळूहळू उघडत आहेत. (सर्व फोटो : सागर कासार )
-
शहरातील सदैव वर्दळीच्या असलेल्या लक्ष्मी रोडवरील सराफा व्यावसायिकांची दुकानं आज सुरू झाल्याचे दिसून आले.
-
जवळपास दोन महिन्यानंतर दुकानं उघडण्यात आल्याने सर्वात अगोदर साफसफाईस करण्यास सुरूवात झाल्याचे पाहावयास मिळाले.
-
साधारण दोन दिवस दुकानाच्या संपूर्ण स्वच्छेतेसाठी लागेल असं दुकानदाराने सांगितलं.
-
दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती नोंदवून घेतली जात आहे. शिवाय तपमान मापक मशीनद्वारे ग्राहकांची तपासणी देखील होत आहे.
-
पुणे मनपा आयुक्त डॉ. शेखर गायकवाड यांनी शहरातील लॉकडाउन कालपासून काहीप्रमाणत शिथील केला आहे.
-
शहरात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर दुकानदारांकडून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले जात आहे.
-
दुकानात आल्याबरोबर हात स्वच्छ करण्यास सॅनिटायझर दिले जात आहे. दुकानादारासह दुकानीतल कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क बांधलेले आहेत.
-
दुकानील व्यवहार करताना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेतली जात आहे.
-
सर्व व्यवहार इतके दिवस ठप्प असल्याने आता दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.
-
लॉकडाउनमुळे अनेक व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल