-
लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासाची परवानगी दिली आहे. यानंतर इतर राज्यांमध्ये अडकलेले कामगार आपल्या मुला-बाळांसह घराकडे रवाना झाले आहेत. (सर्व फोटो – आशिष काळे)
-
पुणे शहरात कामासाठी आलेल्या छत्तीसगडमधील काही कामगारांसाठी सरकारने खास बस गाड्यांची सोय केली आहे. त्यासाठी हे सर्व कामगार रात्री वाघोली बस यार्डाच्या परिसरात सज्ज होते.
-
या सर्व कामगारांसाठी जेवण आणि पाण्याची सोय केली होती. या सर्व धकाधकीच्या काळात लहानगी मुलं लगेच थकतात आणि जागा मिळाली की डोकं टेकून झोपी जातात
-
पैसे कमावण्यासाठी शहर गाठलेल्या कामगारांच्या मनात चिंता आहे ती आता आपण घर कधी गाठणार याची
-
आपल्या बाळाला कडेवर घेऊन रांगेत उभी असलेली एक आई
-
गेल्या काही दिवसांपासून या कामगारांनी अनेक हाल सोसले आहेत.
-
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आता त्यांना आपल्या घरी जाण्याची संधी मिळते आहे.
-
काही जणं बसने तर काही कामगार मिळेल त्या वाहनाने गावाला निघाले आहेत. अलाहबादच्या दिशेने निघालेल्या या कामगारांना चेकपोस्टवर थांबवण्यात आलं.
-
इकडे या सर्व कामगारांची चौकशी करण्यात आली…
-
आणि त्यानंतर त्यांना जाऊ देण्यात आलं

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल