-
करोनाच्या तडाख्यामुळे सध्या मुंबई, पुण्यासह राज्यात कसोटीची परिस्थिती आहे.
-
राज्य सरकार करोनाबाबत ठोस उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा राज्यातील भाजपा नेत्यांचा आरोप आहे.
-
म्हणून राज्य सरकारच्या या धोरणांविरोधात भाजपाने राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.
-
पुण्यात राज्य सरकार विरोधात भाजप कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
-
राज्यात जमावबंदीचे आदेश असल्याने आंदोलनात प्रत्येक ठिकाणी केवळ चार ते पाच कार्यकर्ते निदर्शने करताना दिसत आहेत.
-
'महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात' असे फलक घेऊन पुण्यात निदर्शने करण्यात येत आहेत.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल