मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे दोन महिने बंद असलेली देशांतर्गत नागरी विमान सेवेला आजपासून सुरुवात झाली. (सर्व छायाचित्र – निर्मल हरिंद्रन) -
त्यामुळे इतर राज्यांमधून मुंबईत आगमन झालेले नागरिक विमानतळाबाहेर पडण्यापूर्वी स्क्रिनिंगसाठी मुंबई विमानतळावर प्रतिक्षेत होते.
-
सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग झाल्याशिवाय विमानतळातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांनी सुरक्षेसाठी आपल्या तोंडावर मास्क लावलेले दिसत होते.
-
लॉकडाउननंतर ठप्प झालेली व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
-
देशांतर्गत विमान प्रवास सुरु झाल्याने अनेकांनी समाधनही व्यक्त केले आहे.
-
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लखनऊ येथून विमानाने मुंबईत परतलेली मुस्लिम महिला.
-
आपल्या कुटुंबासह देशाच्या इतर भागात अडकलेले प्रवासी मुंबईत दाखल होऊ लागले आहेत.
-
एका आजारी वृद्ध व्यक्तीचेही विमानाने मुंबईत आगमन झाले. यावेळी संबंधित व्यक्तीची तपासणी करण्यासाठी पीपीई किट घालून सज्ज असलेला कर्मचारी.
-
या महिलेला डॉक्टरांकडून ९ मे पर्यंत क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर तिचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला. आपल्या हातावर मारलेला क्वारंटाइनचा शिक्का दाखवताना महिला.
-
विमान प्रवास करणाऱ्या बहुतांश सर्वच प्रवाशांनी आपल्या तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घातलेले पहायला मिळाले. एकूण आजच्या लॉकडाउननंतरच्या पहिल्याच विमान प्रवासावर करोनाच्या भीतीचे सावट दिसत होते.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”