-
जानेवारी महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरे राजकारणात चांगले सक्रिय झाले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
करोना संकटाच्या या काळात ते पक्षासाठी अत्यंत सकारात्मक भूमिका बजावत आहेत.
-
अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली व काही महत्वाचे मुद्दे मांडले.
-
त्यानंतर त्यांनी सध्याच्या या कठिण काळात डॉक्टर, आरोग्य सेवकांच्या मानधनात कुठलीही कपात होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं.
-
अमित ठाकरे हे उत्तम स्केचेसही काढतात. तसंच व्यंगचित्रकारही आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवर राज ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, अमिताभ बच्चन, मि. बिन यांची काही स्केचेस त्यांनी पोस्ट केली आहेत.
-
कार्यकर्त्यांसोबत राहून काम करण्यावर त्यांच्या अधिक विश्वास आहे. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यापुढचे शिक्षण त्यांनी कॅनडा येथील वेस्टमिनिस्टरच्या डग्लस कॉलेजमधून घेतले आहे.
-
अमित ठाकरे हे त्यांच्या खास लुकमुळेही चर्चेचा विषय ठरतात. अमित ठाकरे उत्तम फुटबॉलही खेळतात.
-
मागच्याच वर्षी अमित ठाकरेंनी त्यांची मैत्रीण मिताली बोरुडेशी लग्न केलं. या विवाहसोहळा मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला राजकारण आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती.
-
कालच मनसेच्या या युवा नेत्याचा वाढदिवस झाला. राजकीय दृष्टया अजून त्यांना बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असते. कार्यकर्त्यांसोबत बसून ते राज ठाकरे यांचे विचार ऐकतात.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल