-
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल या देशांप्रमाणे भारतातही करोना व्हायरसला रोखणारे प्रभावी औषध शोधून काढण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
-
भारतात एकूण ३० समूह करोनाचा फैलाव रोखणारी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात सहा लस प्रकल्पांवर विशेष लक्ष असून त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.
-
त्याशिवाय आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या १० वेगवेगळया औषधांचा करोनावरील उपचारांमध्ये वापर सुरु आहे. सध्या ही औषधं चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.
-
जगभरात ५५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना करोनाची लागण झाली असून ३.५० लाखापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी विज्ञान हेच महत्वाचे शस्त्र आहे.
-
"लस म्हणजे स्विच नाहीय, जी पहिल्या दिवसापासून सर्वांसाठी उपलब्ध होईल. करोनावरील ही लस सर्वांनाच हवी आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखणारी लस मिळवणे एक मोठं चॅलेंज असेल" असे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी सांगितले.
-
कुठलीही लस विकसित करायला १० वर्षाचा कालावधी लागतो. पण करोनावरील लस वर्षभराच्या आत विकसित करण्याचे लक्ष्य आहे.
-
"करोनावरील औषध किंवा लसी संदर्भात आपल्याला उत्पादन क्षमतेचा विस्तार करावा लागेल आणि वितरण व्यवस्था उभी करावी लागेल. त्यामुळे २० ते ३० कोटी डॉलर्स ऐवजी २ ते ३ अब्ज डॉलर्सचा खर्च येईल असे विजयराघवन म्हणाले.
-
एमआरएनए, अटेनुएटेड, एनऐक्टिवेटेड आणि एडजुवेंट या चार वेगवेगळया प्रकारच्या व्हॅक्सीवर संशोधन सुरु आहे,
-
सध्या फिजिकल डिस्टन्सिंग आणि हात स्वच्छ करण्याला कुठलाही पर्याय नाहीय असे विजयराघवन यांनी सांगितले.
-
फॅव्हीपीरावीर, इटॉलीझुंबा, प्लाझ्मा थेरपी, एचसीक्यू, रेमडेसिवीर, बीसीजी लस ही औषधे भारतात चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS