-
पुणे : लॉकडाउनचा चौथा टप्पा उद्या संपणार आहे. दरम्यान, या टप्प्यात काही अंशी उद्योग-व्यवसाय सुरु ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, तरीही अनेक स्थलांतरित मजूर आपल्या राज्यांमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. (छायाचित्र – अरुल होरायझन)
-
बिहार आणि पश्चिम बंगालला जाणाऱ्या रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीच मोठ्या प्रमाणावर तरुण मंडळी पुणे स्टेशन बस स्थानकांत थांबले होते.
-
बस स्थानकांत सध्या एसटी उभ्या नसल्याने मोकळ्या जागेत या तरुणांनी पथारी मांडली.
-
आपापल्या सामानासह हे तरुण इथे जमल्याने रात्री झोपल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी सर्वांनी ते एकमेकांच्या बॅगा चिकटून ठेवल्या होत्या. त्यानंतर त्याचीच उशी करीत त्यांनी ताणून दिली.
-
गटागटानं या तरुण मंडळींनी पुणे स्टेशन परिसरात आश्रय घेतला होता.
-
कोरनाच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन केल्याचे दिसून आले.
-
मात्र, खाली झोपण्यासाठी एकच अंथरुन असल्यानं काहींना या नियमाचे पालन करणे शक्य झाले नाही.
-
हा आहे पश्चिम बंगालचा तरुण प्रतिक दास. कोंढव्यात एका फर्निचरच्या शॉपमध्ये तो सेल्समनचं काम करतो. आपल्या गावी जाण्यासाठी तो तीन दिवसांपासून रेल्वेचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. या काळात त्यानं पुणे स्टेशन बस स्थानक परिसरातच दिवस काढले आहेत.
-
आपल्या मोबाईलसह निवांत पहुडलेला एका स्थलांतरित तरुण.
-
गावाकड जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबियांशी फोनवरुन बोलताना एक तरुण.
-
दिवसभर उन्हाचा कहर असल्यानं जमीनही चांगलीच तापून निघते आहे. या पार्श्वभूमीवर रात्री या स्थलांतरितांची तहान भागणंही मुश्लिल बनलं आहे.
-
आपल्या बॅगांच्या सुरक्षेसाठी त्या डोक्याखाली घेऊन तोंडाला मास्क लावून झोपलेले तरुण.
-
आपल्या सामानासह झोपलेला एक ज्येष्ठ स्थलांतरित नागरिक.
-
सकाळ होईपर्यंत रात्रीच्या गारव्यात पांघरुन नसताना अनेकांना अशीही वेळ काढावी लागली.
-
दिवसभराची पायपीट आणि त्यानंतर शकलेल्या शरीराला न आवरणारी झोप यामध्ये फिजिकल डिस्टंसिंगच्या नियम पाळणार तरी कसं याचं हे बोलक दृश्य.

अमिताभ बच्चन यांना ४.५ कोटींची रोल्स रॉयस भेट दिल्याने दिग्दर्शकाला आईने कानाखाली मारलेली, म्हणाला…