-
महाराष्ट्रात कोणत्याही शहरात जा, वडा-पाव म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. लॉकडाउन काळात गेले दोन ते तीन महिने बाहेरील सर्व खाद्यपदार्थांची दुकानं बंद होती. मात्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता पुण्यातील डेक्कन भागात वडापावची दुकानं सुरु करण्यात आलेली आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुणेकर म्हणजे अस्सल खवय्ये, दुकानं सुरु झाली म्हटल्यावर त्यांनी लगेचच दुकानांबाहेर अशी गर्दी केली होती.
-
महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात गेल्यावर गरीबातला गरीब व्यक्ती एका वडापाववर पूर्ण दिवस काढतो. आज प्रदीर्घ कालावधीनंतर दुकानं उघडल्यानंतर प्रत्येकाला जुने दिवस आठवले असतील.
-
भारती वडेवाल्यांच्या दुकानाबाहेर जमा झालेली गर्दी…
-
सर्व माल तयार झाल्यानंतर दुकानातील कर्मचारी सरकारी नियमांचं पालन करत ग्राहकांची वाट पाहत होते
-
प्रसिद्ध जोशी वडेवाले यांच्या दुकानाबाहेर लागलेली खवय्यांची रांग
-
वडापाव सोबत भजीपावही चाहत्यांच्या सेवेसाठी हजर होता.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल