-
हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जून रोजी मोठं चक्रीवादळ धडकणार आहे. यासाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून, जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. (फोटो :भारतीय हवामान विभाग)
-
महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उद्या (३ जून २०२०) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (फोटो :भारतीय हवामान विभाग)
-
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पुढील २४ तासांत चक्रीवादळची तीव्रता देखील वाढणार आहे. (फोटो :भारतीय हवामान विभाग)
-
मुंबईलाही हे वादळ धडकणार असून, त्यादृष्टीनं मुंबई महापालिका व जिल्हा प्रशासनानं तयारी केली आहे. या वादळामुळे मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. (फोटो : मुंबई महापालिका)
-
मुंबई महापालिकेनं या वादळाविषयी लोकांना सजग करणारी माहिती प्रसिद्ध केली आहे. (फोटो : मुंबई महापालिका)
-
या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात एनडीआरएफचे १० पथकं तैनात करण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये ११ पथक आहेत. गुजरातने आणखी ५ पथक पाठवण्याची मागणी केली आहे. (फोटो : मुंबई महापालिका)
-
मुंबईसह उपनगरात निसर्ग चक्रीवादळामुळे रेड अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळाला बांगलादेशने निसर्ग असे नाव दिले आहे. (फोटो : मुंबई महापालिका)
-
उत्तर हिंद महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती.(फोटो : नासा)
-
या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश कऱण्यात आला होता. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिलं नाव निसर्ग आहे. जे बांगलादेशने सुचवले आहे. (इंडियन एक्स्प्रेस))
-
२००४ मध्ये ६४ नावाची यादी तयार केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या अम्फान चक्रीवादळाला या यादीतील अखेरचं नाव दिलं आहे. त्यानंतर आता नव्या यादीतील पहिलं नाव तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे. (फोटो : एएनआय)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल