-
राज्यात करोनाचा प्रभाव कमी असलेल्या काही भागांमध्ये सरकारने सलूनची दुकानं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र करोनाशी सामना करताना लॉकडाउन काळात सलूनच्या दुकानात जाणं आता ग्राहकांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन)
-
पुण्यातील Lucky Star हे सलून आता ग्राहकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
८ जूनपासून हे दुकान सुरु होणार असलं तरीही पीपीई कीट आणि इतर साहित्यांसोबत सलूनमध्ये काम कसं होईल याचा डेमो देण्यात आला. ज्यामध्ये दुकानात येणाऱ्या ग्राहकाचं सर्वात आधी चाचणी घेतली जाणार आहे.
-
केस कापणं किंवा दाढी करणं या गोष्टी आता दुकानदारांसाठीही फारशा सोप्या राहणार नाहीयेत.
-
यापुढे प्रत्येक वेळी तुमचे केस कापणारा अशा वेशात दिसणार आहे.
-
सरकारने सलूनची दुकानं सुरु करण्यासाठी दुकानदारांना खास नियम आखून दिले आहेत.
-
एखाद्या युद्धावर जाण्याआधी योद्धा ज्या प्रमाणे तयार होतो त्याचप्रमाणे आता सलून दुकानदारांनाही तयार व्हावं लागणार आहे.
-
ग्राहकांच्या अंगावर टाकण्यासाठी अशा प्रकारे खास डिस्पोजेबल टॉवेल वापरण्यात येणार आहेत.
-
एकदा वापर केलेल्या उपकरणांचा परत वापर करता येणार नाही.
-
गेल्या काही महिन्यांमध्ये झालेलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी सलून मालकांच्या संघटनेने दरांमध्ये वाढ करण्याचं ठरवलं आहे.
-
त्यामुळे सलूनमध्ये जाताना आता ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार आहे.
-
केस कापण्यासाठीची कात्री, कंगवा यासाठी खास सोय करण्यात आलेली आहे.
-
स्वच्छता पाळणं हा मोठा नियम प्रत्येक दुकानदारांना घालून देण्यात आला आहे.
-
त्यामुळे प्रत्येकवेळी केस कापताना कात्री, कंगवा सॅनिटाइज केला जाणार आहे.
-
लॉकडाउन काळात सलूनमध्ये जाणं हा सर्वांसाठीच एक वेगळा अनुभव असणार आहे
-
डिस्पोजेबल टॉवेल काढताना दुकानातील कर्मचारी

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”