-
१८९१ पासून कधीही वादळाचा तडाखा न बसलेल्या मुंबईवर सव्वाशे वर्षानंतर पहिल्यांदाच वादळाचे सवाट आहे. 'निसर्ग चक्रीवादळ' मुंबईपासून अवघ्या १०० किलोमीटवर असणाऱ्या अलिबागजवळ जमीनीवर दाखल होणार आहे. याचा परिणाम मुंबईमध्येही दिसून येत आहे. मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे त्यावरच टाकलेली ही नजर… (फोटो: एएनआय, वृत्तसंस्था)
-
मुंबईचा समुद्र खवळलेला असून मच्छिमारांनी समुद्रात जावू नये अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. (फोटो: एएनआय, वृत्तसंस्था)
-
मुंबईमध्ये एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
मुंबईमध्ये मंगळवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. (फोटो: एएनआय, वृत्तसंस्था)
-
मुंबईमधील मरिन ड्राइव्हचे हे दृष्य… (फोटो: एएनआय, वृत्तसंस्था)
-
मुंबईत ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (फोटो: नरेंद्र वसकर)
-
सुरक्षेचा उपाय म्हणून वर्सोवा येथील समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. (फोटो: एएनआय, वृत्तसंस्था)
-
मुंबईच्या समुद्रातील पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (फोटो: नरेंद्र वसकर)
-
शेकडो नागरिकांना बेस्ट बसमधून सुरक्षित स्थळी हलवले आहे. (फोटो: एएनआय, वृत्तसंस्था)
-
नागरिकांनी सतर्क रहावे आणि घाबरुन जावू नये असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे. (फोटो: एएनआय, वृत्तसंस्था)
-
मुंबईमध्ये जोरदार वाऱ्यांसहीत काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
पुढील दोन दिवसांसाठी मुंबईत जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे चारपेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी जमता येणार नाही. (फोटो: नरेंद्र वसकर)
-
करोनामुळे आधीच मुंबईवर संकट असताना निसर्ग वादाळाच्या संकटाला मुंबईकर तोंड देत आहेत. (फोटो: एएनआय, वृत्तसंस्था)
-
वादळ आल्यावर काय करावे काय करुन नये यासंदर्भातील सूचना महापालिका, राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांबरोबरच सेलिब्रिटींनी सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केल्या आहेत. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
नागरिकांनी घरातच थांबावे, प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा या वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन यंत्रणांनी केलं आहे. (फोटो: नरेंद्र वसकर)

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?