-
महाराष्ट्राला सध्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका असून, हे वादळ अलिबाग मार्गे दुपारी मुंबईत धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळाचा काही परिणाम पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातही पहायला मिळतोय.
-
मंगळवारी मध्यरात्री पासून पाऊस आणि सोसोट्याच्या वाऱ्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहराता अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. (सर्व छायाचित्र – कृष्णा पांचाळ)
-
मंगळवारी मध्यरात्रीपासून शहरात सुमारे ३० झाडं पडल्याच्या घटना समोर आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
-
झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक चारचाकी गाड्यांचं यात नुकसान झालंय.
-
वादळी वाऱ्यामुळे पडझड होऊन दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.
-
आतापर्यंत कोणालाही जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
-
मात्र काही नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.
-
रस्त्यावर पडलेलं झाड हटवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी
-
अनेक ठिकाणी डेरेदार वृक्ष पडल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागला.
-
शहरातील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचंही नुकसान झालं

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल