-
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. (सर्व फोटो – सतीश कामत)
-
रत्नागिरी जिल्ह्याला निसर्ग वादळाचा फटका बसलेला असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत.
-
रस्त्यांवर झाडे पडली असल्याने ती हटवण्याचं कामही युद्धपातळीवर सुरु आहे.
-
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागाला जास्त बसण्याची शक्यता असल्यामुळे मंडणगड, गुहागर आणि दापोली या तीन तालुक्यातील सुमारे चार हजार लोकांचे स्थलांतर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
वादळाच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
-
वादळामुळे वीजपुरवठा पूर्णत: बंद ठेवण्यात आला आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल