-
मुंबई आणि महाराष्ट्रावर सध्या निसर्ग चक्रीवादळाचं संकट आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्या लगतच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु झालेलं आहे. (सर्व छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत.
-
दारुखाना परिसरातील लोकांना प्रशासनाने त्यांच्या घरातून बाहेर काढत ट्रान्झिस्ट कँपमध्ये हलवलं आहे. आपल्या लहान मुलाचं पावसापासून संरक्षण करणारी आई
-
स्थानिक लोकं जीवनावश्यक गोष्टी व इतर सामान घेऊन राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत.
-
दुपारच्या कालावधीत हे वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे, त्याआधीच मुंबईत पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत
-
त्यामुळे कोणत्याही प्रकारे जिवीतहानी होऊ नये यासाठी स्थानिक महापालिका प्रशासन किनाऱ्यालगच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल