-
अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडक दिली. (सर्व छायाचित्रे – नरेंद्र वासकर)
-
वादळामुळे मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ते वाहतुक विस्कळीत झाली.
-
अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले.
-
पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा असल्याने घरं व दुकानांसह अन्य ठिकाणीची पत्रे उडाली.
-
रस्त्यांच्या कडेला असलेल्या छोट्या-मोठ्या टपऱ्या दुकानांचे मोठे नुकसान झाले.
-
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यांवर उन्मळून पडलेल्या झाडांना हटवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी मेहनत घेतली.
-
पावसाचा जोर कमी झाल्यावर विस्कळीत झालेला संसार पुन्हा लावताना गृहिणींना मोठी कसरत करावी लागली.
-
प्रमुख मार्गांवर मोठी झाडं पडल्याने वाहतुक सेवा ठप्प झाली होती.
-
साडेतीन वाजेपर्यंत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत होता.
-
चार वाजेनंतर वादळाचा जोर ओसरण्यास सुरूवात झाली.
-
हवामान विभागाच्या माहितीनुसार अलिबागच्या दक्षिण किनारपट्टीवर हे वादळ धडकले. त्यानंतर जिल्ह्यातून पुढे सरकले.
-
वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांना बसला.
-
वादळामुळे मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील संपर्क यंत्रणा कोलमडून पडली. अनेक घरांची लोखंडी छपरे उडून गेली.
-
पोलादपूर, माणगाव, रोहा, तळा, पेण आणि उरण तालुक्यातही वादळाचा प्रभाव दिसून आला.
-
रस्ता खचल्याने एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे चाक जमिनीत रुतले होते.
-
परिसरातील अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर पाणी साचलेले होते.
-
वीजेचे खांब पडणे, सखल भागात पाणी साचणे, आणि घरांची पडझड होणे यांसारख्या अनेक ठिकाणी घटना घडल्या.
-
वादळामुळे मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील संपर्क यंत्रणा कोलमडून पडली होती.
-
चक्रीवादळामुळे रायगडमधील मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले.
-
चक्रीवादळाचा तडखा बसला असला, तरी मोठी जिवीत हानी रोखण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. दोन दिवसांत केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिवीतहानी रोखणे शक्य झाले आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल