-
लहानपणीच वडिलांचं छत्र हरपले. घरची परिस्थिती तशी बेताची. शिक्षणासाठी खिशात दमडीही नाही. पण.. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि मेहनीच्या जोरावर वरूण बरनवाल IAS झाले..
आजच्या स्कसेस स्टोरीमध्ये आपण जाणून घेणार आहोत.. पालघरच्या वरुण बरनवालची संघर्ष गाथा…. पालघरजवळील बोईसरमध्ये वरुण बरनवाल लहानाचा मोठा झाला. दहावीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वडिलांचं निधन झालं. -
घरची परिस्थिती हलाकीची त्यामुळे पुढील शिक्षण घ्यायचं की नाही… यावर घरात चर्चा.
एक भाऊ आणि बहिण यांचंही शिक्षण त्यामुळे कुटुंबावर मोठं संकट ओढावलं. पण या संकटसमयी वरूणच्या मदतीला आई, मित्र आणि नातेवाईक धावून आले. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे वरूणने सायकल दुकानात काम करायला सुरूवात केली. सायकल पंक्चर काढण्याचं काम करत करत वरुणने शिक्षण घेतलं. वरूणची शिकण्याची जिद्द आणि आवड पैशामुळे थांबली नाही. खिशात पैसे नसताना मेहनतीच्या जोरावर आयएएस आधिकारी झाला. २००६ मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर दोन दिवसांत वडिलांचं निधन झालं. त्यात घरची परिस्थिती हालाकीची. त्यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे सोडून देण्याचा विचार केला. पण दहावीच्या निकाल लागला अन् वरूनचं मन बदलले. शाळेत वरून पहिला आला होता. पण दहावीच्या निकाल लागला अन् वरूनचं मन बदलले. शाळेत वरून पहिला आला होता. वरूणची दहावीचे गुण पाहून शिक्षक आणि कुटुंबीयांनी त्याला पुढे शिकवायचं ठरवलं. -
११ वीला घराजवळील महाविद्यालयात शिक्षण घ्यायचं होतं पण डोनेशन देण्यासाठी दहा हजार रूपयेही खिशात नव्हते. त्यावेळी शिक्षण सोडून द्यायचा विचार केला मात्र…
त्यावेळी वडिलांचा इलाज करणाऱ्या डॉक्टरांना ही गोष्ट कळली. त्यांनी वरूण यांना मदत केली आणि महविद्यालयात अॅडमिशन घेऊन दिलं. -
दहावीनंतरची दोन वर्ष वरूणसाठी हालाकीची होती. सकाळी सहा वाजता उठून कॉलेजला जायचा
-
दुपारी दोन वाजल्यानंतर शिकवणया घ्यायच्या. त्यातून मला काही पैसे मिळायचे. त्यानंतर दुकानावर जाऊन हिशोब करायचा.
-
वरूणचा पुण्यातील एमआयटीमध्ये नंबर लागला.
-
इंजिनरिग करण्यासाठी वरूण पुण्याकडे रवाना झाला. त्यावेळीही त्यांला शिक्षक आणि मित्रानं आर्थिक मदत केली.
वरूण सांगतो, माझ्या यशामध्ये शिक्षक, डॉक्टर आणि माझ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे.. इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर वरूणला अनेक खासगी कंपन्यांमधून चांगल्या संधी येत होत्या. त्यावेळी वरूणने सरकारी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुशंगानं त्यांनी UPSCची तयारी सुरू केली. UPSC साठीचा सर्व खर्च त्याच्या भावाने उचलला. २०१३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात वरूणने UPSC परीक्षेत ३२ वा क्रमांक मिळवला. (फोटो सौजन्य – https://www.facebook.com/varun.baranwal?)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल