-
‘निसर्ग’ चक्रीवादळाचा सर्वत्रच फटका बसला असून लोणावळ्याच्या जवळ असणाऱ्या राजमाची गावातील सर्व गावकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे.
-
बुधवारी आलेल्या चक्रीवादळाचा प्रभाव लोणावळ्याच्या परिसरात पाहायला मिळाला. राजमाची येथील अनेक घराचं न भरून येणारं नुकसान झाल आहे.
-
राजमाचीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
-
अनेक पाड्यांवर घरांचे अतोनात नुकसान झाल आहे. राजमाची येथील उदेवाडी वस्तीवर २५ घरे आहेत. तेथील बहुतांश सर्वच घराचं मोठं नुकसान झालं आहे. ज्यांची स्लॅबची घर आहेत तेवढीच व्यवस्थित राहिली आहेत.
-
घरातील साहित्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, घरातील साहित्य वादळामुळे अस्ताव्यस्त झाले होते. घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत.
-
बहुतेक घरांवरील पत्रे, छप्पर वादळाने उडून गेले आहेत. सगळे ग्रामस्थ बुधवारी जीव मुठीत घेऊन वादळाशी सामना करत होते.
-
अनेक जणांनी आपला संसार वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वादळ खूप मोठे असल्याने त्यावर मात करू शकले नाहीत.
-
घरात पावसाचे पाणी आल्याने बसायचं कुठं असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. दारं-खिडक्याचं वादळामुळे नुकसान झालं आहे.
-
अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
-
राजमाची हे ट्रेकर्ससाठी अत्यंत आवडतं ठिकाण मानलं जातं. दरवर्षी अक्षरश: हजारो गिर्यारोहक राजमाचीला भेट देतात.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल