-
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं पुण्यात ठाण मांडलं आहे. त्यातच काही दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याने पावसाळा आता सुरुच होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी जर्किन्स, रेनकोट आणि छत्र्या घेण्यासाठी दुकांनांमध्ये गर्दी केल्याचे गुरुवारी पहायला मिळाले. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
लॉकडाउन आता बऱ्यापैकी शिथील झाल्याने शहरांमधील बाजारपेठाही खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे लोकांना गरजेच्या वस्तू विकत घेणं सोयीचं झालं आहे.
-
दुकानांमध्ये विक्री करताना गर्दी होत असल्याने विक्रेते देखील हातात ग्लोव्ह्ज आणि तोंडाला मास्क, रुमाल बांधून काळजी घेताना दिसत आहेत.
-
नेहमीप्रमाणे यंदाही नव्या ट्रेन्डचे आणि विविध ब्रँडचे जर्किन्स मार्केटमध्ये आले आहेत.
-
विविध डिझाईन्सच्या छत्र्या आणि त्यांची गुणवत्ता तपासून घेताना पुणेकर नागरिक.
-
करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने ग्राहकांनी दुकांनांबाहेर रांगा लावून फिजिकल डिस्टंसिंगचे योग्य प्रकारे पालन केल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी तोंडाला मास्कही लावले होते.
-
दुकानामध्ये आधीच ग्राहकांची गर्दी झाल्याने दुकानाबाहेरही अनेकांनी रांगा लावल्या होत्या.

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण