-
जगभरात आतापर्यंत ६० लाखापेक्षा जास्त नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. आज मानवजातीसमोर मोठं आव्हान निर्माण करणाऱ्या या आजाराला रोखण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. सर्वांच लक्ष करोनाला रोखणारी लस कुठला देश विकसित करतो, त्याकडे लागले आहे.
-
कुठलीही लस विकसित करायला दहा वर्षांचा कालावधी लागतो. पण सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता वर्षअखेरपर्यंत लस बाजारात आणण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. लस या करोना संकटातून बाहेर काढू शकते असे अनेकांना वाटते.
-
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने करोनावर लस विकसित करण्यासाठी पाच कंपन्यांची निवड केली आहे. ब्राझीलने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकाने बनवलेल्या लसीच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे.
-
जगभरात १२० लस प्रकल्पांवर संशोधन सुरु आहे. त्यातील १० लसींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. भारतात सुरु असलेल्या एकूण १४ लस प्रकल्पांपैकी चार लसींवर पुढच्या तीन ते पाच महिन्यात क्लिनिकल ट्रायल सुरु होतील असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
-
वर्षअखेरपर्यंत करोनाचा फैलाव रोखणारी लस विकसित करण्यासाठी अमेरिकेने 'ऑपरेशन वर्प स्पीड'ची योजना आखली आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाच कंपन्यांची निवड केली. यात मोडर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मर्क अँड कंपनी, एस्ट्राजेनेका, या पाच कंपन्या आहेत. न्यू यॉर्क टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
-
निवडण्यात आलेल्या कंपन्यांना अमेरिकन सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल. यामुळे क्लिनिकल चाचण्या तसेच संशोधनाला वेग मिळेल.
-
नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी सुद्धा करोनावर लस विकसित करत आहे. त्याशिवाय सानोफी ही फ्रेंच कंपनी सुद्धा करोना व्हायरसला निष्प्रभावी करणारी लस विकसित करत आहे.
-
अमेरिका १ ते १.५० लाख स्वयंसेवकांवर लसीच्या चाचण्या सुरु करण्याचा विचार करत आहे. जुलैच्या मध्यावर या चाचण्या सुरु करण्याचा विचार आहे. मोडर्ना आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ/एस्ट्राजेनेकाने विकसित केलेल्या लसीच्या चाचण्या जुलैच्या मध्यापासून सुरु होऊ शकतात असे रॉयटर्सने म्हटले आहे.
-
अमेरिकेच्या मोर्डना कंपनीने बनवलेली लस पहिल्या स्टेजमध्ये यशस्वी ठरली आहे. आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
-
मोर्डना कंपनीने mRNA-1273 लसीची दुसऱ्या स्टेजची चाचणी सुरु केली आहे. जुलै महिन्यात अंतिम स्टेजची चाचणी सुरु होईल.
-
तिसऱ्या स्टेजमध्ये तीस हजार लोकांनावर चाचणी घेतली जाऊ शकते. १८ ते ५५ वयोगटातील नागरिकांवर ही चाचणी करण्यात येईल.
-
लस विकसित करण्याचे वेगवेगळे टप्पे असतात. आधी प्राण्यांवर लसीसी चाचणी घेतली जाते. पण सध्याच्या परिस्थितीत काही नियमांना अपवाद करत मानवी चाचणीली परवानगी दिली आहे.
-
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने आतापर्यंत ३० लसी विकसित केल्या आहेत. लस संशोधन योग्य दिशेने सुरु असून पुढचा एक महिना खूप महत्वाचा असणार आहे असे कंपनीने सांगितले आहे.
-
भारतात बीबीआयएल आयसीएमआरसोबत मिळून लस विकसित करत आहे.
-
दरम्यान पुण्यातील एनआयव्ही संस्थेला लस विकसित करण्यासाठी ३० माकडांवर चाचणी घेण्याची परवानगी मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार एनआयव्हीचे वैज्ञानिक लवकरच लस विकसित करण्यासाठी या चाचण्या सुरु करणार आहेत.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल