-
करोना विषाणूचा सामना करणाऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका देशातील कामगारांना बसला. महाराष्ट्रातील अनेक मेंढपाळांनाही या परिस्थितीचा चांगलाच फटका बसला.
-
प्राण्यांना अन्न मिळावं यासाठी हे मेंढपाळ आपलं सर्व कुटुंब घेऊन दरवर्षाला बाहेर पडतात. पुण्याच्या बारामती आणि पुरंदर भागातील काही मेंढपाळ लॉकडाउन काळात कोकणात अडकले होते. लॉकडाउन शिथील झाल्यानंतर अखेरीस यांनी आपल्या घराकडे प्रवास सुरु केला. मध्ये मोकळं माळरान दिसलं की प्राण्यांना चरण्यासाठी मोकळं सोडलं जातं. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
मेंढी-बकऱ्या आपलं काम करत असताना ही मंडळी चार घटका बसून आराम करतात. लॉकडाउन काळात प्राण्यांना अन्न मिळवण्यासाठी खूप कष्ट लागल्याचं या मेंढपाळांनी सांगितलं.
-
आराम करण्यासाठी जागा मिळाली की बाया-माणसं लगेच चूल मांडून भाजी-भाकरीचा बेत आखायला लागतात.
-
आपल्यासोबत आपल्या परिवाराच्या पोटाची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी या बाई माणसावर असते.
-
लॉकडाउन काळात करोनाच्या भीतीमुळे बहुतांश वेळा स्थानिक लोकांनी आपल्याला मदत केली नाही असं या मेंढपाळांनी सांगितलं.
-
अंदाजे एक ते दीड महिना ही सर्व मंडळी रस्त्यावरुन फिरत होती. मोबाईल चार्जिंग करण्याची सोय होत नसल्यामुळे यांना या काळात खूप त्रास सहन करावा लागला.
-
जवळच्या पाणवठ्यावर पुढच्या प्रवासासाठी पाणी घेणं आणि आपली बाकीची कामं आटपून पुढच्या प्रवासासाठी तयार होताना परिवारातील बायका…
-
भाजी-भाकरी तयार झाली की दोन घास पोटात ढकलायचे आणि पुढच्या प्रवासासाठी अंगात बळ आणायचं.
-
मेंढपाळांसाठी हे रहाटगाडगं काही नवीन नाही, पण लॉकडाउनचा काळच काही वेगळा होता असं यांचं म्हणणं आहे.
-
कोणतीही खाण्याची व्यवस्था न नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही मंडळी गेले काही महिने पायपीट करत आहेत. आपल्या लाडक्या मित्रासोबत खेळताना लहानगा मुलगा
-
आराम झाला, पोटात दोन घास गेले की ही मंडळी लगेच पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होतात.
-
लवकरात लवकर घर गाठायचं या उमेदीने हा प्रवास सुरु आहे, सोबतीला आहे नेहमीची काठी न घोंगडं…

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल