-
पुणे : लॉकडाउननंतर तब्बल तीन महिन्यांनी शहरातील उद्याने आणि टेकड्या नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी शहरातील तळजाई टेकडीवर फिरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. (सर्व छायाचित्रे – पवन खेंगरे)
-
या टेकडीवर फिरायला जाणाऱ्यांसाठी केवळ तीन तासांचा अवधीच ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंतच इथे प्रवेश मिळणार आहे.
-
पुणे शहराची फुफ्फुस मानल्या गेलेल्या टेकड्यांपैकी ही एक टेकडी असून ती राज्य शासनाच्या वनखात्याच्या अधिकार क्षेत्रात येते. ही टेकडी वन्यजीव संरक्षक म्हणून घोषीत करण्यात आली आहे. मोरांसह इतर विविध छोटे वन्यप्राणी इथं पहायला मिळतात.
-
सुमारे १०२ हेक्टर जागेत पसरलेल्या या टेकडीवर पुणेकर नागरिक सकाळी आणि संध्याकाळी नित्यनियमाने फिरायला जात असतात. अनेकांसाठी व्यायामासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
-
लॉकडाउनमुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून बंद असलेल्या या टेकडीवर आता पुन्हा नागरिकांनी मोकळा श्वास घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसत आहे.
-
पुण्यात सध्या करोनाचा धोका वाढतच असल्याने या टेकडीवर देखील गर्दी न करण्याचे आवाहन वनखात्याकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे सकाळी केवळ तीन तासंच या ठिकाणी नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
-
करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर इथं फिरायला येणारे नागरिक तोंडाला मास्क लावूनच येताना दिसत आहेत. नागरिकांमध्ये याबाबत बऱ्यापैकी जागृती झाल्याचे दिसते.
-
व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी इथं विविध प्रकारच्या व्यायामाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
-
सावलीखाली बसण्यासाठी या ठिकाणी एक छानसं गोटूलही तयार करण्यात आलं आहे. या ठिकाणी नागरिक ध्यान करण्यासाठी किंवा निवांत गप्पा मारण्यासाठी बसू शकतात.
-
मोठ्या प्रमाणावर कुठलंही बांधकाम इथं झालं नसल्याने गर्द झाडी आणि मातीच्या वाटा यांमुळे विविध वन्यप्राण्यांसाठी हा नैसर्गिक आधिवास अद्याप टिकून आहे.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?