-
आत्मनिर्भर पुणे : वाहनचालकांना आपल्या गाडीत स्वत:च पेट्रोल डिझेल भरण्याची सुविधा करून देण्यात येत आहे. (सर्व छायाचित्रे: पवन खेंगरे)
-
पुण्यातील आरटीओ ऑफिसच्या समोरील पेट्रोल पंपावर वाहन चालकांना आपल्या गाडीत स्वत:च पेट्रोल कसं भरावं याचं प्रशिक्षण देण्यात आलं.
-
पेट्रोल अथवा डिझेल भरण्यासाठी पंपावरील कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्याचा एक मार्ग म्हणून याकडे बघण्यात येत आहे.
-
विकसित देशांमध्ये पेट्रोल अथवा डिझेल भरण्यासाठी पंपांवर कर्मचारी नसतात, तर ग्राहक स्वत:च हे काम करतात. हाच कित्ता आता भारतात गिरवण्यात येत आहे.
-
ग्राहकांनी आपल्या गाडीत स्वत:च इंधन भरल्यास, अन्य कर्मचाऱ्यांशी संबंध येणार नाही व करोनाचा प्रसार टाळता येईल ही आणखी एक बाजू यास आहे.
-
जितकं इंधन भरायचं आहे ते कसे सेट करावे, पैसे कसे भरावेत, इंधन कुणाच्याही मदतीशिवाय कसे घ्यावे आदी बाबींचे प्रशिक्षण सध्या देण्यात येत आहे.
-
ग्राहकांनी पेट्रोल आणि डिझेल कसं भरावं. मशीनचा वापर कसा करावा यासंदर्भात एका बॅनरवर माहितीही लिहिण्यात आली आहे.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे.
-
पेट्रोल पंप चालकांच्या या निर्णयाला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली होती. तसंच आपल्याला इतरावर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी करावं लागेल असं म्हटलं होतं.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?