-
करोना व्हायरसचा फैलाव रोखणारे औषध बनवण्यासाठी जगातील आघाडीच्या फार्मा कंपन्यांकडून जोरात संशोधन सुरु आहे. अमेरिकेतील मॉडर्ना कंपनी या मध्ये आघाडीवर आहे.
-
या कंपनीने तयार केलेल्या लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी ठरली आहे. आता उंदरांवर करण्यात आलेल्या वेगवेगळया चाचण्यांमध्ये सुद्धा ही लस यशस्वी ठरल्याचे दिसले आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
-
मॉ़डर्नाने बनवलेल्या लसीचा एक डोसचं करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पुरेसा आहे. शुक्रवारी प्राथमिक डाटामधून ही माहिती समोर आली आहे. करोनाच्याआधी सार्ससाठी लस संशोधन सुरु असताना एक गोष्ट समोर आली होती. सार्स आणि करोनामध्ये बरेच साम्य आहे.
-
करोना सारख्या व्हायरसला अटकाव करण्यासाठी लस दिल्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या रोगजंतूच्या संपर्कात आल्यास अजून गंभीर आजार होऊ शकतो. खासकरुन पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास असमर्थ असलेल्या लोकांच्या बाबतीत हा धोका जास्त आहे.
-
हजारो तंदुरुस्त लोकांवर लसीची सुरक्षित चाचणी करण्याआधी वैज्ञानिक या धोक्याकडे अडथळा म्हणून पाहत होते. एनआयएआयडी आणि मॉ़डर्नाने जाहीर केलेल्या डाटानुसार काही प्रमाणात यातून सुरक्षिततेची हमी मिळते पण सर्व प्रश्नांचे निराकरण झालेले नाही.
-
'प्राथमिक माहितीची ही तर सुरुवात आहे' असे मायो क्लिनिकमधील इम्युनोलॉजिस्ट आणि लस संशोधक डॉ. ग्रेगोरी पोलंड यांनी म्हटले आहे. त्यांनी मॉडर्नाच्या संशोधनासंबंधीचा पेपर वाचला आहे पण अजून पूर्ण समीक्षा केलेली नाही.
-
पेपर अपूर्ण आहे आणि खूप कमी प्राण्यांवर चाचण्या केल्याचे पोलंड यांनी सांगितले. जुलै महिन्यात ३० हजार स्वयंसेवकांवर mRNA-1273 लसीची अंतिम चाचणी घेण्याची मॉडर्नाची योजना आहे. त्यानंतर ही लस यशस्वी ठरली की, नाही ते समजू शकेल.
-
मॉडर्नाने विकसित केलेली लसीचे डोस उंदराला टोचल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी उत्पन्न झाली, ज्याने व्हायरसला पेशींवर हल्ला करण्यापासून रोखले. कुठलेही साईड इफेक्टशिवाय फुप्फुस, नाकामध्ये इन्फेक्शन पसरले नाही असे लसीचा अभ्यास करणाऱ्या टीमने लिहिले आहे.
-
करोना व्हायरस फुप्फुसापर्यंत पसरला तर सर्वात जास्त धोकादायक आहे.
-
उंदराला एक डोस दिल्यानंतर सात आठवडयांनी त्याची पाहणी केली तेव्हा फुप्फुस पूर्णपणे सुरक्षित होती. तिथे करोनाचा फैलाव झालेला नव्हता असे मॉडर्नाच्या वैज्ञानिकांच्या पाहणीत आढळून आले.
-
पहिल्या आठ जणांच्या मानवी चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
-
प्रतिकात्म छायाचित्र
-
-
-
प्रतिकात्मक छायाचित्र

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल