-
गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी उपनगरी रेल्वेसेवा पुन्हा रुळावर आली आहे. (एक्स्प्रेस फोटो : दिपक जोशी)
-
मुंबई महानगर परिसरातून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलगाडय़ा चालवण्यावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचे एकमत झाल्यानंतर लोकल सुरू झाली आहे. (एक्स्प्रेस फोटो : दिपक जोशी)
-
जवळपास अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या मुंबई उपनगरीय मार्गावरील रेल्वे प्रवासाचा पहिला दिवस गोंधळाचा राहिला. (एक्स्प्रेस फोटो : दिपक जोशी)
अत्यावश्यक सेवेकरी असलेल्या बँक, टपाल आदी कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने अनेक ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले. (एक्स्प्रेस फोटो : नरेंद्र वास्कर) -
पश्चिम रेल्वेवर १२० तर मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर २०० लोकल फेऱ्या धावणार आहेत. (एक्स्प्रेस फोटो : दिपक जोशी)
-
या गाडय़ांमध्ये सर्वसामान्य नागरिक वा नोकरदारांना प्रवेश दिला जाणार नाही. (एक्स्प्रेस फोटो : नरेंद्र वास्कर)
-
स्थानकांना सर्व बाजूंनी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचा गराडा पडल्याचे चित्र होते. जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने एखाद्याला घुसखोरीही करणे अशक्यच होते. तिकीट खिडक्यांजवळही पोलीस तैनात करण्यात आले होते. काही स्थानकात प्रवेशद्वाराजवळच बॅरिके ट्स, दोरखंड इत्यादीने वाट अडवण्यात आली होती. (एक्स्प्रेस फोटो : दिपक जोशी)
-
पहिली लोकल विरारमधून : पश्चिम रेल्वेवर सकाळी ५.३० वाजल्यापासून विरार आणि चर्चगेट स्थानकातून लोकल सुरू होतील. दर १५ मिनिटांनी लोकल धावतील. डहाणू विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धीम्या असतील. त्यानंतर चर्चगेटपर्यंत जलद धावतील. चर्चगेटहून सुटताना या लोकल अंधेरी आणि बोरीवलीपर्यंत जलद जातील व त्यानंतर धीम्या होतील. (एक्स्प्रेस फोटो : दिपक जोशी)
-
पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार, डहाणू अप व डाऊन दोन्ही मार्गावर १२० लोकल फे ऱ्या चालवण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. (एक्स्प्रेस फोटो : नरेंद्र वास्कर)
-
मध्य रेल्वेचेही वेळापत्रक तयार करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या मार्गावर मिळून २०० लोकलफेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (एक्स्प्रेस फोटो : दिपक जोशी)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल