पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात हमखास लिंबाचा वापर होतो. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व तर असतेच त्याशिवाय यातील फायबरचा पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. लिंबाच्या रसाचा वापर करून झाल्यानंतर अनेकजण त्याच्या साली फेकून देतात. पण सौंदर्य खुलवण्यापासून ते भांड्यांवरचे चिवट डाग घालवण्यापर्यंत अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो. तेव्हा लिंबाच्या सालीचा वापर कशाप्रकारे करता येऊ शकतो हे जाणून घेऊयात. – फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या, फ्रिजेमधी दुर्गंधी लगेच दूर होते. – ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते. अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपण जात नाही. एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो. – कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी, सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही. – चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणार काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो. – लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते. घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी, मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल