-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला.
-
प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे.
-
प्रसाद याचे शालेय शिक्षण सातारा येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातून झाले आहे
-
प्रसादचे वडील शहापूर MIDC मध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात तर आई हाऊस वाईफ आहे.
प्रसाद याच्या निकालानंतर त्याच्या कोयनावसाहत येथील घरात अनेकांनी अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली आहे. -
विशेष म्हणजे प्रसाद २०१७ साली कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून इंजिनीरिंग झाल्यानंतर पुणे येथे कंपनीत नोकरीला लागला होता.
-
मात्र आपण अधिकारीच व्हायचे असे मनात ठरवून त्याने १ वर्ष नोकरी केल्यानंतर राजीनामा दिला
-
त्यानंतर प्रसादने पूर्णवेळ स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली.
-
एकाच वर्षात त्याने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले असून तो राज्यात प्रथम आला आहे.
प्रसाद चौगुले निकालानंतर म्हणतोय की,…आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे चीज झाले. माझे वडील विद्युत विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१७ मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. त्यानंतर एक वर्ष पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करत होतो. त्याचवेळी राज्यसेवेची तयारीही करत होतो. सहज म्हणून एक प्रयत्नही केला होता. त्यात यश आले नाही. मग पूर्णतयारीनिशी २०१९ची परीक्षा दिली. परीक्षेसाठी पूर्ण वर्षांचे नियोजन करून अभ्यास केला. मुलाखतीच्या तयारीसाठी खासगी शिकवणी लावली होती. आता पुढे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्याचा मानस आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल