-
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळाच्या लॉकडाउनंतर केंद्र आणि राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरु करण्याची परवानगी दिली आहे. पुण्यातील गुलटेकडी परिसरातला फुलबाजार ग्राहकांसाठी सुरु झाला आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका अजुनही या बाजारात पहायला मिळतोय. ग्राहकांकडून यंदा फुलांना म्हणावी तशी मागणी नाहीये.
-
झेंडू, गुलाब, जाई, निशीगंध अशी अनेक फुलं या बाजारात येत आहेत, पण फार कमी ग्राहक सध्या या बाजारात खरेदीसाठी येत असल्यामुळे व्यापाऱ्यांसमोर मालाचं नुकसान होण्याची चिंता आहे.
-
याचा परिणाम भावावरही व्हायला लागला आहे. ऐरवी शंभर रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली जाणारी फुलं आता ५ रुपये किलोच्या दराने विकली जात आहेत.
-
अनेक व्यापारी ग्राहकांची वाट बघत बसलेले असतात…
-
एखादा ग्राहक आला की त्याच्याशी फारशी घासाघीस न करता शक्य असेल तेवढा माल विकणं हे या व्यापाऱ्यांसमोरचं उद्दीष्ट आहे.
-
लॉकडाउननंतर अजुनही फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यासमोरील चिंता काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये.
-
पुढचे काही दिवस बाजारात ही परिस्थिती कायम राहिलं असं अनेक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल