-
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या जवानांनी हजारो फुट उंचीवर योग प्रात्याक्षिक करून योगाचे महत्व जगाला दर्शवले.उत्तराखंडमध्ये १० हजार फुटांवर जवानांनी योग प्रात्याक्षिकं केली.
-
सिक्कीम येथे आयटीबीपीच्या जवानांनी तब्बल १८ हजार ८०० फुट उंचीवर योगासनं केली.
-
जवानांनी योगासनं करून जागतिक योग दिन साजरा केला.
-
योगाचं महत्व अवघ्या जगाला पटलेलं आहे.
-
आज संपूर्ण जगभरात योग दिन साजरा होतो आहे.
-
लडाखमध्ये तर शुन्य डिग्री तापमानात देखील जवानांनी १८ हजार फुट उंचीवर योग प्रात्याक्षिकं करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
-
जवानांना आपल्या फिटनेससाठी योगासनं अतिशय फायदेशीर असतात.
-
गोठवणाऱ्या थंडीतही जवानांनी योग प्रात्याक्षिक करून योगाचं महत्व जगाला दाखवलं.
-
योगासन करतानाही जवानांची शिस्त दिसून आली
-
अरुणाचल प्रदेशमध्ये देखील आयटीबीपीच्या जवानांनी योग दिन साजरा केला.
-
लोहितपूर येथील अॅनिमल ट्रेनिंग स्कूलमध्ये घोड्यांसोबत योग प्रात्याक्षिक केली.
-
आय़टीबीपीच्या जवानांकडून विविध ठिकाणी आज योगासनं करण्यात आली.
-
उत्तराखंड येथे आयटीबीपीच्या जवानांनी भारत -चीन सीमेवर योगासनं केली
-
१४ हजार फुट उंचीवर असलेल्या बद्रीनाथ जवळील वसुधर ग्लॅशियर येथे योग करण्यात आले.
-
गोठवणाऱ्या थंडीत व बर्फाळ प्रदेशात जवानांनी योगासनं करून योगाचे महत्व अधोरेखित केले
-
२०१५ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
-
जागतिक योग दिन साजरा करून जवानांनी जणू काही आरोग्यासाठी योगा हा जगाला मंत्रच दिला.
-
बर्फाळ प्रदेशातही कठीण योगासन करून जवानांनी आपली क्षमता सिद्ध केली.
-
कोणत्याही परिस्थिती सर्वांनी योग नियमित करावा असाच त्यांनी संदेश दिला.
-
योगामुळे नवचैतन्य निर्माण होत असते, योग हा निरोगी आयुष्याचा मंत्र आहे.
-
अगदी एका पायावर उभा राहूनही जवानांनी योगासनं केली.
-
योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल