-
पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात एकही करोनाबाधित रुग्ण न आढळल्याने, पुणे मनपा समाज विकास विभागामार्फत रांगोळी काढून सर्व महिलांचे कौतुक करण्यात आले. (सर्व छायाचित्र – सागर कासार)
-
यावेळी कोरना काळात या ठिकाणी करोना योद्ध्याची भूमिका बजावणाऱ्या पोलीसांचेही औक्षण केले गेले.
-
या कार्यक्रमाचे आयोजन समूह संघटक अलका गुजनाळ यांनी केले होते.
-
गल्यांमधील रस्त्यांवर काढलेल्या रांगोळ्यांनी रस्ते भरून गेले होते.
-
या उपक्रमामुळे या परिसरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.
-
घरी रहा सुरक्षित रहा, असा संदेशही रांगोळीतून देण्यात आला.
-
येथील महिलांनी देखील या कार्याला प्रतिसाद देत, रांगोळीत सहभाग नोंदवला.
-
अगदी मोजक्या रंगात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
-

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”